माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी ठाण्यातील रुग्णालयात दाखल

    23-Dec-2024
Total Views |

Vinod Kambli
 
ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कावीळ झाल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्यांच्या मेंदूला थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. या कारणास्तव त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढील पाच ते सहा दिवसांत ते पूर्णपणे बरे होऊन पूर्ववत होण्याची शक्यता असल्याची माहिती आकृती हॅास्पीटल संचालक शैलेश सिंग यांनी दिली.
 
"डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत, मी मरणाच्या दारातून परत आलो आहे. अजून मी मेलो नाही, जिवंत आहे आणि मरणारही नाही. लवकरच मी पुन्हा उभा राहीन आणि क्रिकेटच्या मैदानात दिसेन," असे भावनिक उद्गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांनी व्यक्त केले.