अब्दुल लतीफ अल नेसेफ यांनी रामायण आणि महाभारत या दोन्हींचा अरबी भाषेत अनुवाद केला असून त्याच्या अरबी आवृत्त्याही प्रकाशित केल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान अब्दुल लतीफ अल नेसेफ हे त्या ग्रंथांवर पंतप्रधान मोदींची स्वाक्षरी घेताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी त्यांच्या मन की बातमध्येही या दोन्ही अरबी अनुवादीत ग्रंथांचा उल्लेख केला होता.
पंतप्रधानांच्या भेटीचा आनंद व्यक्त करत अब्दुल लतीफ अल नेसेफ म्हणाले, "मी खूप खूश आहे. माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. रामायण आणि महाभारताच्या अबरी आवृती पाहून पीएम मोदीसुद्धा त्यावेळी खूश झाले. हा असा क्षण आहे जो कायम आमच्या आठवणीत राहील."