वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या अडचणीत वाढ!

आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बेहिशोबी मालमत्तेवर टाच!

    02-Dec-2024
Total Views |

jagan
 
 अमरावती : वायएसआर पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिनांक २ डिसेंबर रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि सक्तवसुली संचालनालय (ED) यांनी YSRCP अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणांचा सर्वंकष तपशील सादर करण्याचे निर्देश दिले गेले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या दोषमुक्तीच्या याचिका आणि तेलंगणा उच्च न्यायालयासमोर प्रलंबित प्रकरणांचा तपशील सादर करण्याचे आदेशही दिले आहे. आंध्र प्रदेशचे उपसभापती रघुराम कृष्णम राजू यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. जगन यांच्या खटल्यांच्या सुनावणीत विलंब झाल्याचा आरोप केला गेला असून सदर खटला दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्याची विनंती केली गेली होती. न्यायमूर्ती अभय एस. ओका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले की, तेलंगणा उच्च न्यायालयाने यापूर्वी दैनंदिन खटला चालवण्याचे आदेश दिले होते. तथापि, खंडपीठाने प्रदीर्घ विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.