मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे काँग्रेसी मनसुबे उघड! आमदाराने केली मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी

    19-Dec-2024
Total Views |
 
congress
 
बंगळूरु : (Mumbai) महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव सीमावादावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच कर्नाटक सरकारमधील काँग्रेस आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचे असेल तर मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदाराने केली आहे.
 
बेळगावमधील लोकांनी मुंबई विधानसभेत प्रतिनिधीत्व केले असल्याने मुंबईवर आमचा हक्क आहे, असा दावा या आमदाराने केला आहे. काँग्रेस आमदाराने केलेल्या मागणीचा सीमाभागातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
 
सध्या बेळगावमध्ये सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्या आणि विकासावर चर्चा सुरू असतानाच अचानक एक धक्कादायक मागणी करण्यात आली. कर्नाटकमधील अथनी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावसह मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील नेत्यांवर सवदी यांनी निशाणा साधताना बेळगावचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वीही सवदी यांनी ही मागणी केली होती. त्यांनी केलेल्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता या मागणीमुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.