मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahfuj Alam Bangladesh Controversial Post) बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार म्हणून काम करणारे महफूज आलम यांच्या एका पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. नुकत्याच झालेल्या बांगलादेश दिनानिमित्त त्यांनी सोशलमिडियावर एक पोस्ट लिहित त्यामध्ये विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील पाकिस्तानी सैन्यावर बांगलादेशी सैन्याच्या विजयाचे प्रतीक असल्याचा उल्लेख केला होता. त्यासोबत भारतातील पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा हे बांगलादेशचा भाग दाखवत महफूज आलमने ईशान्य आणि उत्तर भारतात सांस्कृतिक असंतोष भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढल्यानंतर त्याने आपली पोस्ट डिलीट केली.
हे वाचलंत का? : चिन्मय कृष्ण दास यांचे वकील रवींद्र घोष भारतात; केले धक्कादायक खुलासे!
ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील लोकांची संस्कृती समान असल्याचा दावा महफूज आलम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. भारतातील उच्चवर्णीय आणि 'हिंदू कट्टरतावाद्यां'च्या वृत्तीमुळे पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाल्याचा आरोपही त्यांनी केला. महफूजने आपल्या पोस्टमध्ये 1975 आणि 2024 च्या घटनांची पुनरावृत्ती करण्याची गरज व्यक्त केली. १९७५ मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती.
महफूज यांनी २०२४ मध्ये शेख हसिना यांना सत्तेवरून हटवण्याची कथित योजना अलोकतांत्रिक असल्याचे म्हटले आहे. महफूजने फेसबुकवर एक वादग्रस्त नकाशा शेअर केला, ज्यात भारताचा पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम बांगलादेशचा भाग असल्याचे दाखवले आहे. परंतु याप्रकरणी वाद वाढल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी पोस्ट हटवली.