'एक देश एक निवडणूक' विधेयकाला २६९ सदस्यांचा पाठिंबा
विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे रवाना
17-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशातील निवडणुक प्रक्रियेला गती मिळावी म्हणनू लोकसभेत एक देश एक निवडणूक विधायक सादर करण्यात आले आहे. या विधेयकवर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर, ई व्होटींग घेण्यात आले, ज्यामध्ये पहिल्या फेरीत विधेयकाच्या बाजूने २६९ मते पडली, तर दुसऱ्या बाजूला विधेयकाच्या विरोधात १९८ मते पडली. यानंतर लोकसभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी घोषणाबाजी देत गोंधळ सुरू केला. यानंतर लोकसभेचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की जर एखाद्या सदस्याला मतपत्रिकेद्वारे मतदान करायचे असेल तर तो करू शकतो. इलेक्रॉनिक मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना जर आपण चूक केली असेल तर ही चूक आपण मतपत्रिकेद्वरे पुढच्या फेरीत दुरूस्त करू शकता.
विधेयक 'जेपीसी'कडे रवाना
विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ च्या बाजूने कौल दिला आहे. दुसऱ्या बाजूला इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी यास विरोध दर्शवला आहे. सध्या हे विधेयक संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसी कडे रवाना करण्यात आले आहे. यामध्ये सर्व पक्षांची मतं ऐकूण घेतली जातील. यानंतर पुन्हा एकदा नवीन विधेयक संसदेच्या समोर ठेवण्यात येईल, आणि यावर देखील चर्चा करण्यात येईल. या विधेयकावर बोलताना कायदेमंत्री अर्जुन राम मेघावल म्हणाले की देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे हे विधेयक कुठल्याही प्रकारे राज्यांची शक्ती कमी करणारे नसून हे विधेयक पूर्णपणे संविधानास अनुकूल आहे.