डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान २०२४’ पुरस्काराने सन्मानित

    17-Dec-2024
Total Views |

Dr. Chandraprakash Dwivedi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dr. Chandraprakash Dwivedi)
भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि साहित्यिक समृद्धीला समर्पित 'डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान २०२४' यावर्षी चित्रपट जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांना प्रदान करण्यात आला. चाणक्याची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संबोधित केले.
उपस्थितांना संबोधत सुनील आंबेकर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वीपासूनच त्यांचा बंगालशी अतूट संबंध होता. डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रासाठी समर्पित लोकांची गरज समजून १९२५ मध्ये केवळ १७ लोकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पायाभरणी केली. त्यावेळी ती टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान होते. जेव्हा-जेव्हा हिंदू समाज राष्ट्रवादापासून दूर गेला तेव्हा देशाला फाळणी, दहशतवाद यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. पण जेव्हा जेव्हा ते एकत्र आले तेव्हा त्याचे परिणाम राष्ट्रहिताचे होते. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले दुःखदच आहेत, मात्र तेथील हिंदू समाज संघटितपणे त्याचा निषेध करत आहे, हा सर्वांसाठी धडा आहे.

डॉ द्विवेदी यावेळी म्हणाले की, मला अनेक सन्मान मिळाले आहेत, मात्र डॉ. हेडगेवार प्रज्ञा सन्मान हा माझ्यासाठी सर्वात मोठा आहे. हा सन्मान म्हणजे ज्या विचारधारेला आणि मार्गाने मी माझे जीवन सुरू केले त्याचा हा सन्मान आहे. भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून नवीन पिढी ती समजून घेत आहे हे पाहून आनंद होतो. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गीतेतील संदेश जीवनात आचरणात आणण्याच्या महत्त्वावर जोर दिला.