मालेगाव व्होट जिहादप्रकरणी किरीट सोमय्यांकडून गौप्यस्फोट

शाखेत सिराज मोहम्मदची ५ बेनामी खाती उघड

    15-Dec-2024
Total Views |

Vote jihad
 
मालेगाव : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव व्होट जिहाद (Vote jihad)  फंडिंग घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखेत सिराज मोहम्मदची ५ बेनामी खाती सापडली. यामध्ये ५३ कोटी बेनामी व्यवहार केल्याप्रकरणाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस आणि एटीएसला महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकावरही कारवाई करण्याची विनंती केली होती, असे किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
 
एवढेच नाहीतर किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर अवैध बँक खातेधारकांची नावांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात जयेश लोटन मिसाळ, गणेश लोटन मिसाळ, मनोज गोरख मिसाळ, प्रतिक पोपट जाधव अशा नावाने बँक खाती खोलण्यात आली होती, असे एका पत्रकात नमूद करण्यात आले होते, या व्होट जिहादप्रकरणाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
 
किरीट सोमय्या यांचे ट्विट जसेच्या तसे
 
 
 
बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव शाखेत सिराज मोहम्मदची ५ बेनामी खाती सापडली. ५३ रूपये कोटी बेनामी व्यवहार मी पोलीस आणि एटीएसला महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकावरही कारवाई करण्याची विनंती केली होती असे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गौप्यस्फोट करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
ज्यात २१ राज्यांतून २५५ कंपन्यांमधून ११२ कोटी ७१ लाख ९७ हजारांहून अधिक पैसे जमा करण्यात आले होते. या व्यतिरिक्त बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत अशाचप्रकारे ५ बेनामी खाती उघडण्यात आली असून यामाध्यमातून व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले, तसेच याप्रकरणात एकूण ५३ कोटी ७५ लाखांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती देण्यात आली.