नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ( Lalkrishna Adwani ) यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अपोलो रुग्णालयात ९६ वर्षीय भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. यापूर्वी ४ जुलै २०२४ रोजीही अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.