पुण्यात रोहिंग्यांची घुसखोरी उघड! मिळवलं अधिकृत आधारकार्ड आणि पॅनकार्ड!

    13-Dec-2024
Total Views |
 

ROHINGYA
 
पुणे : (Rohingya) काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एका सभेत बोलताना मुंबईतील सर्व बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी मुस्लीमांना आणि रोहिंग्यांना हुसकावून लावण्याची घोषणा केली होती. मात्र हे केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच पुण्यातील जवळच्या देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वत:चे घर बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
नेमकं काय आहे प्रकरण?
 
सर्वसामान्य माणसाचं मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वत:च्या हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न असतं. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. कागदपत्रांची जमवाजमव यासाठी हेलापाटे मारावे लागतात पण, पुण्यातील बेकायदेशीरपणे घुसलेल्या रोहिंग्याने ह्या दोन्ही गोष्टी जमवल्या आहेत. मुजम्मिल मोहम्मद अमीन खान असे या म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्याचे नाव असून त्याने पुण्यातील देहूरोड परिसरामध्ये स्वत:चे घर बांधले आहे. तसेच त्याने कोणतेही कागदपत्र स्वतः सादर न करता केवळ ५०० रुपयात आधार कार्ड मिळवून पुढे भारतीय नागरिक म्हणून वावरताना स्वतःसाठी आणि पत्नीसाठी भारतीय पासपोर्टही मिळविले
 
पोलिसांच्या माहितीनुसार मुजम्मिलन डिसेंबर २०१२ मध्ये म्यानमार सोडून बेकायदेशीर मार्गाने पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पत्नी आणि मुलासह भारतात घुसला. बांगलादेशातील ‘रेफ्युजी कॅम्प’ मध्ये राहताना त्याने काही काम मिळावे यासाठी प्रयत्न केला, पण हाती काही न लागल्याने शेवटी भारतात पश्चिम बंगालमध्ये काम मिळू शकेल, असे त्याला समजले. त्याच्या हाती काही लागलं नाही. कोलकात्याला मनासारखं काम न मिळाल्यानं मुजम्मिल पुण्यात आला. तळेगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत त्याने काही काळ नोकरी केली. दरम्यान, अधिक पैसे कमावण्यासाठी त्याने देहू रोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली. तो ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून कपडे आणून विकत असे. त्याने भिवंडीतील एका दुकानातून कागदपत्रं स्वतः सादर न करता केवळ ५०० रुपये देऊन आधार कार्ड बनवल्याचे तपासात समोर आले आहे.भिवंडीतील दलालाने आधार केंद्रात खानच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा पोलिसांना संशय आहे
 
म्यानमार आणि बांगलादेशमधून आणखी रोहिंग्यांना भारतात यायला मुजम्मिलने मदत केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तब्बल दहा वर्षांपासून मुजम्मिल बिनदिक्कतपणे देहूमध्ये राहतो आहे.पुण्यात असताना त्याला सुपारी व्यवसायाबद्दल कळले. त्यानुसार त्याने स्थानिक बाजारात सुपारी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. याच काळात तो देहू रोड येथील गांधीनगर येथील रहिवाशी चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात आला. कांबळेच्या घराला लागून त्यांची मोकळी जागा होती. पोलिसांनी सांगितले की, मुजम्मिलने कांबळे यांची अंदाजे ६०० चौरस फूट जागा ८०,००० रुपये रोख देऊन “खरेदी” केली. त्यानंतर जमीन ताब्यात घेऊन त्यावर घर बांधले. कोणत्याही पोलिस यंत्रणेच्या निदर्शनास न येता, तो भारतीय नागरिक असल्याचे भासवत सुमारे एक दशकापासून आपल्या कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास होता. पोलिसांनी आता मुजम्मील खानला ताब्यात घेतले असून पुढील तपासाला वेग आला आहे.