‘कोकण हार्टेड गर्ल’ने लिहिलं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं गाणं!, ‘अहों’सोबतचा पहिला प्रोजेक्ट

    13-Dec-2024
Total Views |
 
ankita walawalkar
 
 
 
मुंबई : ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिला फार कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कोकणाचे महत्व सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अंकिताने केला होता आणि त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अंकिता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. आणि बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच तिने तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराबद्दल सांगितले होते. अंकिताचा होणारा नवरा मनोरंजनविश्वातील संगीतकार असून त्याचं नाव कुणाल भगत आहे. दरम्यान, होणाऱ्या नवऱ्यासोबत अंकिताने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्याची माहिती तिने सोशल मिडियावर दिली आहे.
 
अंकिता वालावलकरने ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेसाठी तिने प्रोमो गीत लिहिलं असल्याची माहिती नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या २३ डिसेंबरपासून एक नवीन मालिका ‘लक्ष्मी निवास’ भेटीला येणार आहे. याच मालिकेसाठी अंकिताला प्रोमो गीत लिहिण्याची संधी मिळाली.
 

ankita walawalkar 
 
अंकिताने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका तुमच्या भेटीला येतेय. या मालिकेचं नाव आहे लक्ष्मी निवास. यासाठी मी गाणं लिहिलंय… मी लिहिलेलं हे पहिलं गाणं हर्षवर्धन वावरे याने गायलं आहे आणि कुणाल-करण यांनी हे गाणं कंपोझ केलंय. लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि या प्रोमोच्या निमित्ताने मी याची सुरुवात केली आहे.”
 
अंकिताच्या या पहिल्याच गाण्यावर नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी यांच्या मध्यवर्ती भूमिका असून ही मालिका २३ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे.