'पुष्पा ३'मधून फहाद फासिल गायब, दिग्दर्शकावर अभिनेता झाला नाराज

    10-Dec-2024
Total Views |
 
pushpa 2
 
 
मुंबई : ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता झाला आहे. 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढून नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, जितका या चित्रपटात अल्लू अर्जूनचा अभिनय गाजला त्याच प्रमाणे अभिनेता फहाद फालिसच्याही अभिनयाची तितकीच चर्चा झाली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका कदाचित फारशी प्रेक्षकांना आवडली नसल्यामुळे अशी माहिती मिळत आहे की फहाद फासिल 'पुष्पा ३'मध्ये दिसणार नाही.
 
'पुष्पा २' चित्रपटाच्या शेवटी पुष्पा ३ ची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या भागातही पुष्पा इंटरनॅशनल प्लेअर म्हणून आपली खेळी खेळणार आहे. पण यात फहाद फासिलचे पात्र भंवर सिंग शेखावत दिसणार नाही असे दिसत आहे. फहाद आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यातील काही मतभेदांमुळे फहाद तिसऱ्या भागात दिसणार नाही आहे.
 
फवादने एका मुलाखतीदरम्यान 'पुष्पा' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला होता की, '''पुष्पा या चित्रपटाने कलाकार म्हणून माझ्यासाठी काहीही केले नाही. सुकुमार सरांनाही मी तेच सांगतो. मला काहीही लपवायची गरज नाही. मी पूर्ण सत्य सांगत आहे. मी मल्याळम इंडस्ट्रीत माझे काम करत आहे.''
 
'पुष्पा २' चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून अल्लू अर्जून, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान, ‘पुष्पा ३’ मध्ये अभिनेता विजय देवरकोंडाची एन्ट्री होणार असे सांगण्यात येत आहे.