तुळजाभवानी चरणी ११ तोळ्यांची मोहनमाळ अर्पण

    01-Dec-2024
Total Views |
Tulajabhawani

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात. यावेळी भक्तांकडून देवीला अनेक दान अर्पण केले जाते. परभणी येथील जयश्री रमेशराव देशमुख यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी ११ तोळे सोन्याची मोहनमाळ अर्पण केली आहे. यावेळी मंदिर संस्थानच्या ( Tulajapur ) वतीने देशमुख कुटुंबियांना देवीची प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला.

तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. या क्षेत्राचे महत्त्व म्हणजे स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. फार मोठ्या संख्येने लोक या देवस्थानाला भेट देण्यासाठी येतात. या शक्तिपीठावर अनेक भाविकांची अपार श्रध्दा आहे. आपल्या अपार भक्तिपोटी लोक या तीर्थक्षेत्राला दान अर्पण करतात. परभणी येथील जयश्री रमेशराव देशमुख यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी १-२ नव्हे तर ११ तोळे सोन्याची मोहनमाळ अर्पण केली आहे. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने आभारस्वरुपी देशमुख कुटुंबियांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना भेट म्हणून देवीची प्रतिमा देण्यात आली.