भूल भुलैया ३

कलाकारांच्या गर्दीत हरवलेली कथा

Total Views | 33
 
Bhool Bhulaiya 3
 
 ‘भूल भुलैया ३.’ प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट सर्वप्रथम २००७ साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर या चित्रपटाचे पुढचे दोन ‘भूल भुलैया २’ (२०२२) आणि आता ‘भूल भुलैया ३’ (२०२४) मध्ये प्रदर्शित झाले. पहिल्या चित्रपटाची कथा आणि त्यानंतर आलेल्या दोन भागांतील कथा, यात प्रचंड तफावत असून केवळ मोंजोलिका आणि बंगाली संस्कृती याव्यतिरिक्त यात कोणचेही साम्य नाही, असं नक्कीच म्हणावं लागेल. तेव्हा, जाणून घेऊयात अनिस बाजमी दिग्दर्शित ‘भूल भुलैया ३’ चित्रपट आहे तरी कसा?
 
प्रेक्षकांना जितके प्रेमपट, अ‍ॅक्शनपट अगदी चवीने पाहायला आवडतात, तितकाच भयपटांनाही हजेरी लावणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. सगळेच भयपट हे लहान मुलांना पाहण्यासाठी नसले तरी हिंदी चित्रपटसृष्टीत बालप्रेक्षकही जपला गेला पाहिजे, या उद्देशाने ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट तयार केले जातात. याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘भूल भुलैया ३.’ प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट सर्वप्रथम २००७ साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर या चित्रपटाचे पुढचे दोन ‘भूल भुलैया २’ (२०२२) आणि आता ‘भूल भुलैया ३’ (२०२४) मध्ये प्रदर्शित झाले. पहिल्या चित्रपटाची कथा आणि त्यानंतर आलेल्या दोन भागांतील कथा, यात प्रचंड तफावत असून केवळ मोंजोलिका आणि बंगाली संस्कृती याव्यतिरिक्त यात कोणचेही साम्य नाही, असं नक्कीच म्हणावं लागेल. तेव्हा, जाणून घेऊयात अनिस बाजमी दिग्दर्शित ‘भूल भुलैया ३’ चित्रपट आहे तरी कसा?
 
‘भूल भुलैया 3’ चित्रपटाची कथा सुरू होते २०० वर्षांपूर्वी. राजस्थानमधील राजाच्या एका कुटुंबातील ही कथा. त्यावेळी एक स्त्री नृत्य करते म्हणून तिला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. त्यानंतर थेट २०० वर्षांनंतरचा आजचा काळ दाखवला गेलेला आहे, जिथे रुह बाबा अर्थात अभिनेता कार्तिक आर्यन भूतप्रेत पळवण्याचादावा करुन लोकांना फसवण्याचे उद्योग करीत असतो. पण, चित्रपटाची नायिका मीरा अर्थात अभिनेत्री तृप्ती डिमरी त्याचा हा खोटेपणा उघडा पाडते आणि त्याला राजस्थानला घेऊन जात मोंजोलिकाचा आत्मा त्या राजवाड्यातून कायमस्वरुपी बाहेर काढायला सांगते. एकीकडे हा सगळा खेळ सुरू असताना, दुसरीकडे कथेत मल्लिका अर्थात विद्या बालन आणि मंदिरा अर्थात माधुरी दीक्षित यांची एन्ट्री होते. काही प्रसंगांमुळे या दोघीही मोंजोलिका आहेत, असा समज घरातील व्यक्तींना आणि रुह बाबाला होऊ लागतो. पण, खरे सत्य जेव्हा बाहेर येते तेव्हा प्रेक्षक नक्कीच अचंबित होऊन पाहात राहतील. तर असे या चित्रपटाचे थोडक्यात कथानक.
 
कोणत्याही कलाकृतीचे जर एकाहून अधिक भाग येत गेले, तर ती कथा सहसा जोडलेली असली पाहिजे, अशी प्रेक्षकांचीही अपेक्षा असते. पण, ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाच्या बाबतीत पहिल्या आणि दुसर्‍या भागाचे दिग्दर्शकच बदलल्यामुळे केवळ ‘मोंजोलिका’ हाच एक धागा पुढे नेत, दुसर्‍या भागाची कथा गुंफली गेली. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या भागाचे दिग्दर्शन एकच असल्यामुळे त्यांनी दुसर्‍या भागाची कथा तिसर्‍या भागात जोडली असती, तर हा चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. मुळात ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाची कथा ही फार सुंदर असून, तिची मांडणी अधिक उठावदारपणे करता आली असती. मात्र, एकावेळी अधिक कलाकारांची गर्दी चित्रपटात झाल्यामुळे कोणत्याही एका पात्राला व्यवस्थित कॅमेरा स्पेसच मिळाली नाही, हे चित्रपट पाहताना नक्कीच जाणवते. शिवाय, चित्रपट हा मध्यांतरापूर्वी फारच रटाळ आणि मुळ मुद्द्याकडे जाण्यास फार उशीर लावणारा आहे. मध्यांतरानंतर खर्‍या कथेला जरी सुरूवात होत असली, तरी खरी मोंजोलिका कोण, याचा संयम राखत चित्रपटाच्या शेवट फार अनपेक्षितपणे फिरवण्यास लेखक आणि दिग्दर्शकाला यश आले आहे, असे नक्कीच म्हणता येईल. कारण, ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाचा मूळ गाभा मोंजोलिका असल्यामुळे तिच्याबद्दलची गूढता फार छान ठेवला आहे. चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीताबद्दल बोलायचे झाल्यास कथा अपुरी पडत असल्यामुळे त्यात गाण्यांचा समावेश केला आहे, असे वाटते. मात्र, पहिल्या भागापासून लोकप्रिय असणारे ‘आमी जे तोमार’ हे गाणे श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या आवाजात ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते. खरे तर पुन्हा एकदा पूर्वीची मोंजोलिका अर्थात विद्या बालनची तिसर्‍या भागात एन्ट्री झाल्यामुळे चित्रपट अधिकच प्रभावी आणि रंजक असेल असे वाटले होते. पण, तसे प्रत्यक्षात मात्र घडलेच नाही. याउलटच चित्रपटाची कथा शेवटाकडे वेगळ्याच वळणावर गेल्यामुळे ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाची ही श्रृंखला असू शकत नाही असेच वाटते.
 
अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेता कार्तिक आर्यन याच्या अभिनयात कोणतेही नावीन्य दिसत नाही. मुळात पहिल्या भागात अक्षय कुमार होता आणि त्याच्याजागी दुसर्‍या भागात कार्तिक आर्यनला ही भूमिका दिली हे स्पष्टच आहे. पण, म्हणतात ना ‘जुनं तेच सोनं असतं.’ त्यामुळे कार्तिक आर्यन हा अक्षय कुमारच्या अभिनयाला तोड देऊ शकला नाही, तर अभिनेत्री तृप्ती डिमरी ही तिच्या इतर भूमिकांच्या चर्चेमुळे या चित्रपटाचा भाग झाली, असे वारंवार तिच्या अभिनयातून ती सिद्ध करते. पण, तिचा या चित्रपटात फार कमी वाटा दिसतो. माधुरी दीक्षित जिच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत, त्या चाहत्यांना माधुरी हिला भूताच्या रुपात पाहणे जरा वेगळे नक्कीच वाटू शकते. पण, तिने तिच्या पात्राला न्याय नक्कीच दिला आहे. संपूर्ण चित्रपटात जी खरे तर या चित्रपटाची नायिका आहे किंवा जिच्या पात्रामुळे ‘भूल भुलैया 3’ लोकप्रिय झाला. ती मोंजोलिका अर्थात अभिनेत्री विद्या बालन हिने पुन्हा एकदा तिचे अभिनय कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय राजपाल यादव, अश्विनी काळसेकर, संजय मिश्रा यांनी विनोदी भूमिका साकारत चित्रपटात अधिक रंगत आणली आहे. मात्र, एखाद्या चित्रपटाची श्रृंखला जर का येत असेल, तर त्याची कथा, पात्र एकमेकांशी जोडलेली असावी अशा अपेक्षा असते. पण, त्या अपेक्षा पूर्ण करण्यास हा चित्रपट यशस्वी झाला नाही.
 
चित्रपट : ‘भूल भुलैया ३’
दिग्दर्शक: अनिस बाजमी
कलाकार : कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश

(CM Devendra Fadnavis Reviews Maharashtra Security Amid India-Pak Tensions)भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. मुंबईतील वर्षा निवासस्थानी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर ..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज नँन्सी डेपोच्या प्रवासी निवारा-नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन

भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्‌घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121