काँग्रेसच्या ८५०० रुपये महिना आश्वासनाचं पुढे काय झालं?
08-Nov-2024
Total Views |
मुंबई : ( Congress )लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसने देशातील प्रत्येक राज्यातील महिलांना खोटे आश्वासन देऊन फसवणूक केली आहे. महाराष्ट्रातदेखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी महिलांना फसवण्याचे काम करत आहे पण यावेळेस मविआच्या खोट्या आश्वासनांना, भूलथापांना महिला फसणार नाहीत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनाम्यात इंडिया आघाडी सत्तेत आल्यास महिलांच्या खात्यात दर महिन्याला ८,५०० रुपये जमा करणार, असे सांगितले होते. तसेच आश्वासनांचे गॅरंटी कार्ड भरून घेत 'खटाखट योजने'ची तुफान घोषणाबाजी देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसचे सरकार आले नाही आणि मग पुढे त्या पैशांचे काय झाले अशी विचारणा होऊ लागली. सरकार यायच्याआधीच असे अर्ज भरून घेऊन एकप्रकारची मतांची बेगमी इंडिया आघाडीने केली आहे. त्यामुळेच काँग्रेसचा हा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.
दुसरीकडे राज्यात मविआचे नेते प्रचारादरम्यान मतांसाठी कोणतीही आश्वासने देत सुटले आहेत. परंतु हेच नेते समोरच्या पक्षाने आश्वासने दिली तर ती केवळ मतं विकत घेण्यापुरतीच असतात, असा दुटप्पीपणा करताना दिसतात. एकीकडे लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे, ह्याचा प्रचार करायचा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांना याच योजनेच्या नावाने मतं मागण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुरु आहे.