महिलांनो मतदान करताना या १० गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

    08-Nov-2024
Total Views |
 
WOMEN
 
मुंबई : ( MahaVikas Aghadi ) राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे १२ दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांसंदर्भात महाविकास आघाडीच्या महिलांविरोधी भूमिकेचा पर्दाफाश झाला आहे. म्हणूनच महिला मतदारांनी मतदान करताना या गोष्टी लक्षात ठेवून मतदान करावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.
 
मतदान करताना या १० गोष्टी नक्की लक्षात ठेवा
 
1. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरिमा राजे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत खालच्या शब्दांत छत्रपतींच्या घराण्यातील सुनेवर टीका केल्याचे दिसून आले.”दम नव्हता…” असा शब्दात सतेज पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. हे अपशब्द फक्त एका काँग्रेस उमेदवाराच्या विरोधातील नसून शिवछत्रपतींच्या घराण्यातील स्त्रीच्या विरोधातील होते.
 
2. संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी युसफ चौघुले शरद पवार गटाचा पदाधिकारी निघाला. त्यामुळे या आरोपीला सोडवण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे वृत्त समोर आले होते.
 
3. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना बदनाम करत मविआने घेतली बलात्कारी नराधमाची बाजू घेतली.
 
4. चंद्रपूर जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिस त्या नराधमाला बेड्या घालण्यासाठी गेले तेव्हा त्याला पळून जायला ह्याच काँग्रेसच्या बड्या नेत्याने मदत केली होती.
 
5. काँग्रेसचे आमदार राहिलेल्या भानुदास मुरकुटेंना बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अटक केली. कित्येक वर्षांपासून ते एका महिलेवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली होती.
 
6. उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्या प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांना माल म्हणून हिणवतात.
 
7. संजय राऊत नवनीत राणा यांना नाची म्हणतात, स्वप्ना पाटकरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात.
 
8. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड अत्याचारावर न्याय मागणाऱ्या पीडित महिलेला शिव्या घालतात.
 
9. उबाठा गटाचे नेते सुनील राऊत आपल्या प्रतिस्पर्धी सुवर्णा करंजे यांना बकरी गळ्यात बांधली म्हणून हिणवतात.
 
10. महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या भल्यासाठी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी हीच काँग्रेस कोर्टात गेली होती.