राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे ठाकरेंना द्यावेत!

नितेश राणेंचा घणाघात

    07-Nov-2024
Total Views | 67
 
Thackeray
 
मुंबई : संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे त्यांचे मालक उद्धव ठाकरेंना द्यावेत, असा घणाघात भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
 
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत भाजप आणि महायूतीच्या नेत्यांना फुकटचे सल्ले देत होते. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार साहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याला आम्ही कुणीच समर्थन देत नाही. त्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली आहे. परंतू, संजय राऊत यावरून आमच्या देवेंद्र फडणवीसजींना संस्कृती आणि संस्कार शिकवत आहेत. पण संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे कधी उद्धव ठाकरेंना दिले आहेत का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे साहेबांसारख्या जेष्ठ नेत्याला जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करण्याचे पाप केले होते. त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आणि परंपरा दिसली नाही का? कुणाला जेवणाच्या ताटावरून उठवणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का? चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना सवाल
 
उद्धव ठाकरेंनी माफी मागावी!
 
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका केली. त्या चिमुकल्याने अजूनपर्यंत जगसुद्धा पाहिले नाही. अशावेळी त्याच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची संस्कृती दिसली नाही का? आता तुम्ही कुठल्या तोंडाने दुसऱ्यांना सल्ले देत आहात? उद्धव ठाकरेंना कुणाच्या वैयक्तिक कुटुंबावर हवं ते बोलण्याची मुभा दिली आहे का? उद्धव ठाकरे काहीही बोलले तर ती ठाकरी भाषा आणि दुसरं कुणी काही बोललं तर लगेच महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार काढणार का? त्यामुळे ज्याप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या वक्तव्याची माफी मागितली तशीच उद्धव ठाकरेंनादेखील मागायला सांगावी," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121