कॅनडात झालेल्या हिंदूंवरील हल्ल्यात तीन आरोपी गजाआड

सुरक्षेची चिंता व्यक्त करत नरेंद्र मोदींचा तीव्र निषेध

    05-Nov-2024
Total Views |
 
Hindus
 
ब्रॅम्प्टन : कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण यामुळे हिंदूंचा क्रोध शांत होत नाही. कॅनडात मोर्चा काढून त्यांनी आपल्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत लिहिले की, कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करत असल्याचे सांगितले. तसेच मुत्सद्यांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशा अनेक हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. आम्ही अपेक्षा करतो की कॅनडा सरकार न्यायबाबदचा निर्णय सुनिश्चित करेल आणि कायद्याचे राज्य राखेल.
 
 
 
दरम्यान हिंदू मंदिरात भाविकांवर खलिस्तानी हल्ल्यानंतर कॅनडातही हजारो हिंदू समाजाचे लोक रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. यावेळी मोर्चा काढत असताना त्यांनी उघडपणे खलिस्तान मुर्दाबाद आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या मोर्चाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॅनेडियन हिंदूंनी ‘कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर निषेधाचे फोटो शेअर केले आणि लिहिले,“हिंदू मंदिरांवरील सततच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ब्रॅम्प्टनमध्ये हजाराहून अधिक कॅनेडियन हिंदू एकत्र आले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅनेडियन हिंदूंवरील हल्ल्याने हिंदू फोबिया तात्काळ थांबवू असे नमूद करण्यात आले आहे.