शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स ९४२ अंकांनी तर निफ्टीत ३०९ अंकांनी घसरण

    04-Nov-2024
Total Views | 25
share-market-collapsed


मुंबई :
     आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदविली गेली. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स ७९ हजारांच्या खाली तर एनएसई निर्देशांक निफ्टी २४ हजारांच्या खाली गेल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दि. ०५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री आणि वाढलेली अस्थिरता यामुळे बाजारात घसरण दिसून आली.




बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स आज किंचित घसरणीसह ७९,७१३.१४ अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स १५०० हून अधिक अंकांनी घसरून ७८,२३२.६० वर आला. अखेर सेन्सेक्स ९४१.८८ अंकांनी(१.१८ टक्के) घसरून ७८,७८२.२४ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी-५० देखील ३०९ अंकांच्या(१.२७ टक्के) प्रचंड घसरणीसह २३,९९५.३५ च्या पातळीवर बंद झाला.

विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रमी विक्रीमुळे आणि कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील कमाई अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे ऑक्टोबर बेंचमार्क जवळपास ६ टक्के घसरला. बीएसई अदानी पोर्ट्सचे समभाग सर्वाधिक ३.२३ टक्क्यांनी घसरला तर पॉवर ग्रिड, टायटन, टाटा स्टील, नेस्ले इंडिया या कंपन्यांचे शेअर्स प्रामुख्याने घसरले. दुसरीकडे, बाजारात मोठी घसरण होऊनही महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स २ टक्क्यांनी वधारले. तसेच, टेक महिंद्रा, स्टेट बँक, एचसीएल टेक, इन्फोसिस हिरव्या रंगात बंद झाले.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121