पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक जाहीर
04-Nov-2024
Total Views |
मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पंतप्रधानांची दि. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत सभा होणार आहे. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा असणार आहे.
चार दिवसांत नऊ सभा
नियोजित कार्यक्रमानुसार दि. ८ नोव्हेंबर रोजी धुळे, नाशिक, दि. ९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, दि. १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि दि. १४ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, नवी मुंबई, मुंबई याठिकाणी नरेंद्र मोदींच्या सभा होणार आहेत.