अपोलो हॉस्पिटलची कार्यक्षमता वाढणार; मुंबई, लखनऊ येथील हॉस्पिटल्सचा प्रामुख्याने समावेश

    04-Nov-2024
Total Views |
apollo-hospitals-unveils-new-expansion


मुंबई : 
    भारतातील आघाडीची खाजगी आरोग्य सेवा प्रदात्यांपैकी एक असलेल्या अपोलो हॉस्पिटलने नवीन विस्तार योजनेचे अनावरण केले. मुंबई आणि लखनऊ येथे १ हजार ६२५ कोटींच्या नवीन प्रकल्प बिल्ड, ऑपरेट आणि मॅनेजमेंट कराराद्वारे कार्यान्वित केले जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत देशभरातील ११ ठिकाणी ३,५०० बेड्स जोडून हॉस्पिटल्सची क्षमता वाढविण्यात येणार आहे.




६ हजार १०० कोटी खर्चाच्या विस्तारामध्ये ग्रीनफिल्ड, ब्राउनफील्ड आणि संपादन प्रकल्पांचा समावेश असून पुढील चार वर्षांत १ हजार ६२५ कोटींच्या एकत्रित गुंतवणुकीसह मुंबई आणि लखनऊ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर, १,७०० कोटी भूसंपादन, सुरक्षा ठेवी आणि प्रारंभिक विकासासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अर्थसंकल्पातील उर्वरित ४,४०० कोटी अंतर्गत निधी आणि जमा होणार आहेत.

मुंबई विस्ताराव्यतिरिक्त अपोलो हॉस्पिटल्स २०० खाटा जोडून लखनऊ येथील हॉस्पिटलचा विस्तार करत आहे. ज्यात एकूण खाटांची संख्या ५०० वर पोहोचली असून तब्बल ३२५ कोटींचा प्रकल्प सध्याच्या हॉस्पिटलला लागून असलेल्या १.२ एकर जागेवर तीन वर्षां नवा प्रकल्प होणार आहे. अपोलो हॉस्पिटल्सने वरळी, मुंबई येथे १,३०० कोटींच्या अंदाजे गुंतवणुकीसह ५०० खाटांचे हॉस्पिटल स्थापन व व्यवस्थापित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.