उत्तराखंड येथे भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू

    04-Nov-2024
Total Views |
 
Uttarakhand bus accident
 
उत्तराखंड : एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Uttarakhand bus accident) झाला असल्याची घटना उत्तराखंड येथील अल्मोडा येथे घडली आहे. या अपघातात ४० प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच्या सुमारास घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीखालून रामनगरकडे एक प्रवाशी बस निघाली असता ही दुर्घटना झाली. यावेळी बसमध्ये ४० हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान घटनास्थळी सध्या एसडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
दुर्घटनेवेळी बस खाली कोसळत असताना अनेक प्रवाशांनी आरडाओरड केली आहे. या दुर्घटनेवेळी काही प्रवाशी हे बसमधून बाहेर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली.
 
 
अग्रलेख