जम्मू काश्मीरच्या बैठकीत कलम ३७० हटवण्याविरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ
04-Nov-2024
Total Views |
जम्मू-काश्मीर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) येथे झालेल्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला. ही बैठक समोवारी ३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निव़डणुकच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत कलम ३७० आणि ३५ए हटवण्याच्या विरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ निर्माण झाला आहे.
याचदरम्यान आता पीडीपीचे आमदार वाहिद पारा यांनी हा प्रस्ताव आणला होता. विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यात आल्याचा प्रस्ताव संबंधित बैठकीत मांडण्यात आला आहे.
वाहिद यांच्या या कृतीला भाजप आमदारांनी कडाडून विरोध केला. त्यांनी हे विधानसभेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले गेले आहे. तसेच वाहिदच्या हकालपट्टीची मागणी केली. दरम्यान. या प्रस्तावाला कोणतेही एक महत्त्व नसल्याचे ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशानंतर येथून कलम ३७० हटवल्यानंतर अलीकडेच पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यानंतरची ही पहिलीच विधानसभा असून पहिल्याच दिवशी सभापतींच्या निवडीनंतर हा गदारोळ झाला आहे.