माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा कपोलकल्पित! खासदार मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
30-Nov-2024
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या मुख्यमंत्री कोण होणार? अशा चर्चा सुरु असतानाच खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव माध्यमांमधून पुढे आले होते. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा कपोलकल्पित आहे, असे म्हणत त्यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला.
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना आमचे नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे."
"आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.