बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ब्रिटेनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांचा निषेध
29-Nov-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशातील अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. चितगाव येथे झालेल्या वकीलाच्या हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडून तातडीने शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच आता ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे.
ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात भरसभागृहात निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणाची माहिती एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने प्रसारीत केली आहे. त्यात लिहिले की, "ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशातील धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्वरित कारवाईची मागणी केली", असे ट्विट करण्यात आले.
ब्रिटनचे खासदार @BobBlackman यांनी बांगलादेशातील हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्वरित कारवाईची मागणी केली. #Bangladeshpic.twitter.com/3MCdRz7MMK
बांगलादेशातील शेख हसीना यांचे वकील सैफुल इस्लाम यांची झालेली हत्या म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे शेख हसीना म्हणाल्या आहेत. याप्रकरणामध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी शेख हसीना यांनी मुहम्मद युनूस यांच्या अंतरीम सरकारवर टीकेची तोफ डागली.
तसेच चिन्मय दास यांनाही अटक करण्यात आली होती. त्यावर आता शेख हसीना म्हणाल्या की, सनातन धर्माच्या नेत्याला अन्यायकारकरित्या अटक करण्यात आली होती. चिन्मय दासची तात्काळ सुटका करण्याची मागणी शेख हसीना यांनी केली आहे.