एकनाथ शिंदेंचा राजीनामा! नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती
26-Nov-2024
Total Views |
मुंबई : राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि अन्य नेते उपस्थित होते.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याने चौदावी विधानसभा विसर्जित झाली आहे. त्यानंतर आता लवकरच नवीन मंत्रिमंडळाची स्थापना होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला बहुमत मिळाल्याने लवकरच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल. राज्यपालांनी एकनाथ शिंदेंचा राजीनामा स्वीकारत नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.