मला त्रास देणारे सगळे साफ झालेत! अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर टीका

    25-Nov-2024
Total Views |
 
Ashok Chavan
 
लातूर : मला त्रास देणारे सगळे साफ झालेत, अशी टीका भाजप नेते अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यावरून अशोक चव्हाणांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
अशोक चव्हाण म्हणाले की, "लातूरमध्ये एक पडला दुसरा निसटता निसटता वाचला. हे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माझ्या नावाने नांदेड नांदेड, भोकर असं बोंबलून बोंबलून फिरून गेला. आता दीडशे मतांनी निवडून आला. हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते आहेत," अशी टीका त्यांनी नाना पटोलेंवर केली.
 
हे वाचलंत का? -  "थोडक्यात वाचलास! मी सभा घेतली असती तर..."; अजितदादा-रोहित पवारांची अचानक भेट
 
ते पुढे म्हणाले की, "माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सगळे साफ झालेत. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झालेत. त्यामुळे मला त्रास देऊ नका," अशी टीकाही अशोक चव्हाणांनी केली आहे.