विदर्भात शतप्रतिशत भाजप!

    24-Nov-2024   
Total Views |

Vidarbha
 
राज्यभरातील सर्वाधिक मतदारसंघ असलेला विभाग म्हणजे विदर्भ. विदर्भात एकूण 62 मतदारसंघ आहेत. त्यामुळे साहाजिकच इतर विभागांच्या तुलनेतसर्वच पक्षांना या विभागात थोडी जास्त ताकद लावावीलागते. यावेळी विदर्भातील बहुतांश जागांवर ‘महायुती विरुद्ध महाविकास आघाडी’ असा थेट सामना होता. इथे भाजपने 47, शिवसेना नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आठ, काँग्रेस 40, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट नऊ आणि उबाठा गटाने 13 जागा लढवल्या. यात सर्वात जास्त म्हणजेच 38 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील विदर्भाचा निकाल म्हणजे सत्तेच्या जवळ घेऊन जाणारी पायरी अशी एक समजूत आहे. त्यामुळेच प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी विदर्भातील निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. याशिवाय देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख या मोठ्या, दिग्गज नेत्यांची नाळही विदर्भाचीच. त्यामुळे इतर विभागांच्या तुलनेत निश्चितच विदर्भातील प्रचारावर सर्वच पक्षांचे अधिक लक्ष केंद्रीत असते.
 
राज्यभरातील सर्वाधिक मतदारसंघ असलेला विभाग म्हणजे विदर्भ. विदर्भात एकूण 62 मतदारसंघ आहेत. त्यामुळे साहाजिकच इतर विभागांच्या तुलनेतसर्वच पक्षांना या विभागात थोडी जास्त ताकद लावावीलागते. यावेळी विदर्भातील बहुतांश जागांवर ‘महायुती विरुद्ध महाविकास आघाडी’ असा थेट सामना होता. इथे भाजपने 47, शिवसेना नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आठ, काँग्रेस 40, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट नऊ आणि उबाठा गटाने 13 जागा लढवल्या. यात सर्वात जास्त म्हणजेच 38 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
 
यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असला, तरी विदर्भात मात्र या मुद्द्याचा तितकासा प्रभाव दिसला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक मोठेे नेते विदर्भातील प्रचारासाठी मैदानात उतरले होते. भाजपबद्दल सांगायचे झाल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव या मोठ्या नेत्यांनी विदर्भात प्रचारसभा घेतल्या. महायुतीने आपल्या प्रचारात विदर्भातील अनेक प्रमुख मुद्द्यांना हात घातला. विदर्भात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. हाच धागा पकडून महायुतीने शेतकर्‍यांसाठी ‘भावांतर योजने’ची घोषणाकेली. या योजनेचा प्रचारात बराच सकारात्मक प्रभाव पाहायला मिळाला.
 
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीकडून ‘भाजप सत्तेत आला तर संविधान बदलणार’ हा ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्यात आल्याने कुणबी, दलित आणि ओबीसी मतदार भाजपपासून काहीसा दुरावला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी हा ‘फेक नॅरेटिव्ह’ महायुतीने योग्य पद्धतीने खोडून काढला आणि त्यामुळे हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी दुरावलेला मतदार परत महायुतीकडे आला.
 
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘एक हैं तो सेफ हैैं’ आणि योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा राज्यासह विदर्भातही तितकाच प्रभावी ठरला. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या प्रचारातून हा नारा लोकांच्या मनात रुजवला. त्यामुळे हिंदू मतदार एकवटला़. तसेच देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रिपदासह ऊर्जामंत्रिपद देखील असल्याने त्यांनी घेतलेले विविध निर्णय जसे, शेतकर्‍यांना वीजदेयक माफ करणे, मागेल त्याला सौर कृषिपंप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वात नागपूरचा केलेला कायापालट, या सगळ्यामुळे महायुतीचे काम मतदारांना भावले. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ‘लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांच्या चांगलीच पसंतीस पडली. याचाच परिणाम म्हणून यावेळी अनेक महिलांनी घराबाहेर पडत महायुतीला भरभरुन मतदान केले. त्यामुळे साहाजिकच मतदानाचीटक्केवारीदेखील वाढली.
 
विदर्भाची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी फडणवीसांनी पाठपुरावा केला. महिला, तरुण, शेतकरी, ज्येष्ठ अशा समाजातील सर्वच घटकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला असताना, केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटपापासून, तर प्रचारयंत्रणेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली. फडणवीसांनी राज्यभरात सभांचा धडाका घेत, कठोर मेहनतीने या संधीचे सोने केले. या मेहनतीचे फळ म्हणजेच विदर्भातील निकाल.
 
विदर्भात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपने आपल्या संकल्पपत्रात अनेक घोषणा केल्या. शेतकर्‍यांना कर्जमाफी, खतांवरील डॠडढ कर मिळणार परत, सोयबीनला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपये भाव, काटोलमध्ये संत्र प्रक्रिया उद्योगउभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत आणि 45 हजार गावांत पांदण रस्त्यांची बांधणी करणे, या सर्व आश्वासनांमुळे शेतकर्‍यांचा महायुती सरकारवरचा विश्वास अधिक दृढ झाला.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राहुल गांधी प्रचारासाठी मैदानात होते. नागपूरच्या पहिल्याच सभेत संविधानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या संविधानाच्या कोर्‍या प्रती पुढे आल्या आणि त्यांचे ‘संविधान बचाओ’चे नाटक उघडे पडले. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात असलेला सुप्त संघर्षदेखील विदर्भातील पराभवाला कारणीभूत असू शकतो. तसेच निवडणुकीचे योग्य नियोजन नसणे, मित्रपक्षांची नाराजी आणि जागावाटपावेळी झालेला गोंधळ या सगळ्याचा परिणाम निकालात दिसून आला.
 
उबाठा गटाने विदर्भातील जास्तीत जास्त जागांवर दावा केला. मात्र, काँग्रेसने या जागा देण्यास नकार दिला. अंतिम बोलणी होण्याच्या आधीच उबाठा गटाने परस्पर उमेदवारांची नावे घोषित करून टाकली. या प्रकारातून दिसलेली मविआची नियोजनशून्यता मतदारांची चांगलीच हेरली आणि पुन्हा एकदा महायुतीला आपली पसंती दर्शवली.

भाजप 38
शिवसेना (शिंदे) 04
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 06
काँग्रेस 09
उबाठा 04
अन्य 01

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....