"देवेंद्रने मुख्यमंत्रीपद भुषवावे ही महाराष्ट्राची इच्छा!" फडणवीसांच्या आईंनी व्यक्त केल्या भावना

    23-Nov-2024
Total Views |
 
Fadanvis
 
नागपूर : देवेंद्रने मुख्यमंत्रीपद भुषवावे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, अशी भावना फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून महायूतीची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. दरम्यान, फडणवीसांच्या आईंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
सरिता फडणवीस म्हणाल्या की, "देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचे त्याच्यावर असलेले प्रेम या दोन गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे. देवेंद्रने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवावे ही महाराष्ट्राची आणि जनतेची ईच्छा आहे. माझा मुलगा कसा आहे हे मला पूर्णपणे माहिती असल्याने मला कधीच आरोप-प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही. त्यामुळे मी कधीही त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही."
 
हे वाचलंत का? -  हा विजय आमच्यासाठी ऐतिहासिक : एकनाथ शिंदे
 
"लाडक्या बहिणींचे हे यश आहेच पण देवेंद्रची लोकप्रियता आणि मेहनतसुद्धा आहे. तो अतिशय हुशार आणि चतुर आहे. प्रत्येक गोष्टीला योग्य तो न्याय देण्याची त्याच्यात हिंमत आहे. त्यामुळेच तो विजयी झाला. वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याने आपल्या डोळ्यासमोर व्हिजन ठेवून त्यादृष्टीने मेहनत केली. दिवसातल्या २४ तासांपैकी तो फक्त २ ते ३ तासांच्या वर झोपलेला नाही. प्रचार काळात तो खूप व्यस्त होता. याआधी मी त्याला मुख्यमंत्री झालेले पाहिले आहे. त्याकाळात त्याने किती चांगले काम केले हेसुद्धा मला माहिती आहे. त्यामुळे आतासुद्धा तो मुख्यमंत्री होणार आहे. पाच वर्षांच्या अनुभवानंतर तो अतिशय उत्कृष्टपणे तो वरती जाईल. संपुर्ण राज्य तो उत्तमपणे चालवेल याची मला खात्री आहे," असा विश्वासही सरिता फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.