विधानसभा निवडणुक टेक्नोलॉजीमुळे बनली सुलभ

२८ ॲप्ससह माहिती तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर

    22-Nov-2024
Total Views |
Apps

ठाणे : यंदाची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ( Election ) टेक्नोलॉजीमुळे सुलभ बनली आहे. २० नोव्हे.रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत २८ ॲप्ससह माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. याकरिता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना अधिकारी नरेंद्र भामरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जवळपास २८ ॲप्स व संकेतस्थळांच्या मदतीने जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामध्ये सी-व्हिजील ॲप, इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम, एन्कोअर - नॉमिनेशन, ॲफिडेविट पोर्टल, एन्कोअर स्कृटीनी, एन्कोअर पर्मिशन्स, ईव्हीएम मॅनेजमेंट सिस्टिम, वोटर टर्नआऊट, एन्कोअर कॉऊंटिंग, एन्कोअर एक्सपेंडिचर मॉनिटरिंग, एन्कोअर इंन्डेक्स कार्ड ॲण्ड स्टॅस्टिकल रिपोर्टिंग, ईआरओ नेट, इलेक्ट्रॉनिकली ट्रॅन्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टिम, ऑब्झर्व्हर पोर्टल, इन्टिग्रेटेड इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सिस्टिम, चक्रिका ॲप, पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, पीपीएमएस-एमओ, पीपीएमएस-कॉऊंटिंग, पीपीएमएस-फॉर्म१२, पीपीएमएस-बँक, ऑफलाईन एक्सेल, पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टिम, वोटर सर्व्हिस पोर्टल, सर्व्हिस पोर्टल रजिस्ट्रेशन पोर्टल, नॅश्नल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल, रिझल्ट ट्रेंड टिव्ही, सक्षम ॲप या ॲप्सचा समावेश आहे.