काबुल : २०२१ मध्ये सत्तेवर आल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानातील ( Afghanistan ) गैरइस्लामिक आणि सरकारविरोधी साहित्य काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. माहिती आणि संस्कृती मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट इस्लामिक कायद्यानुसार म्हणजे ‘शरिया’नुसार साहित्याचा प्रचार करणे आणि अफगाण मूल्यांविरोधात असलेल्या सामग्रीवर प्रतिबंध घालणे हा आहे. २०२१ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत तालिबानने इस्लामी आणि अफगाण मूल्यांविरोधात ४०० पेक्षा अधिक पुस्तके जप्त केली.