माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वाहनावर हल्ला!

    19-Nov-2024
Total Views |
 
Anil Deshmukh
 
नागपूर : माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचाराकरिता काटोलच्या रुगण्यालयात दाखल करण्यात आले.
 
हे वाचलंत का? -  संजय शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला!
 
काटोल विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार आणि अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांच्या प्रचारार्थ नरखेड येथील सांगता सभा आटोपून अनिल देशमुख काटोल येथे तिनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. दरम्यान, काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला. यातील एक दगड अनिल देशमुखांच्या डोक्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.