सज्जाद नोमानीला अटक करा : नितेश राणे

    17-Nov-2024
Total Views |
Nitesh Rane

मुंबई : “पीएफआय’ आणि ‘आयएसआय’सारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा,” अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) केली आहे. ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच, ’हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,’ असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे म्हणाले की, “तालिबान समर्थक सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर करून ‘व्होट जिहाद’चे एक उत्तम उदाहरण दिले आहे. ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा प्रतिनिधी म्हणून नोमानी ‘व्होट जिहाद’ची भाषा करत होते. परंतु, आपल्या देशात राहून हे करण्याची काय गरज? हा माझा प्रश्न आहे. ‘वक्फ बोर्ड’ हे कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नसून फक्त आमच्या भारतातच आहे,” असेही त्यांनी सांगितले.

हा सफेद कॉलर आतंकवादी

सज्जाद नोमानींचा इतिहास तपासल्यास ते तालिबान समर्थक आहेत. जाहीर फतवे काढणारा हा सफेद कॉलर आतंकवादी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कसाबला संपवले, तोच नियम या नोमानीला लावायला हवा. देशात राहून ते अशा प्रकारचे ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ चालवू शकत नाहीत. ‘वक्फ बोर्डा’च्या नावाने जमिनी लुटणे आमच्या महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. ‘पीएफआय’, ‘आयएसआय’सारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा आणि नोमानीला अटक करा.