मलबार हिल विधानसभेचे उमेदवार मंगल प्रभात लोढांची भव्य रॅली!
17-Nov-2024
Total Views |
मुंबई : मलबार हिल विधानसभेचे भाजपचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांच्या प्रचारार्थ रविवार, १७ नोव्हेंबर रोजी भव्य रॅली काढण्यात आली होती. सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "लोकांच्या मनात अतिशय चांगला उत्साह असून त्यांचा प्रतिसाद उत्तम आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या मताधिक्याने मलबार हिल विधानसभा आणि महाराष्ट्रात जिंकू. एक है तो सेफ है या नाऱ्यानुसार सर्वांनी एकत्र राहायला हवे. रोहिंग्या, बांग्लादेशी मुंबईत नको," असे ते म्हणाले.
सकाळी १० वाजता ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानापासून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे नाना चौक, ताडदेव, ब्रीच कँडी, नेपियन सी मार्ग, चंद्रलोक, वाळकेश्वर रोड, सुख सागर, ठाकुरद्वार, सीपी टँक, व्हीपी रोड, खेतवाडी, लॅमिंग्टन रोड आणि रॉयल ओपेरा हाऊस अशा या रॅलीचे स्वरूप होते.