आम्ही बहुमताने सरकार बनवू ; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

    16-Nov-2024
Total Views |
Devendra Fadanvis

मुंबई : मी महाराष्ट्रभर दौरे करत आहे. त्यामुळे मला राज्यभरातून सकारात्मकता जाणवत आहे. विशेषत: महिला मतदारांमध्ये अधिक दिसत आहे. पूर्वी आमच्या सभांना ७० टक्के पुरुष असायचे आणि महिला कमी असायचा. पण, आता महिलाही जवळपास ५० टक्के दिसून येत आहेत. ही निवडणूक मोठी लढाई आहे. पण, आम्ही बहुमताने सरकार बनवू, असा विश्वास भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला...


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, महाराष्ट्रात काँग्रेस ओबीसी समुदायात फूट पडत आहे. याबाबत काय सांगाल?


राहुल गांधी यांनी अमेरिकेत हे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता समोर आली आहे. महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा एक दबाव आहे. जर त्यांना जर वेगळे केले, तर दबाव गट राहणार नाही. त्यामुळे ‘भारत जोडो’द्वारे भारतातील समाजांमध्ये फूट पाडा आणि त्यानंतर ‘भारत तोडा’ असे दिसून येते.

ते म्हणतात की, आपण फूट पाडण्याचे काम करीत आहोत. योगी आदित्यनाथ यांनी ’बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला जात असल्याचे दिसते. त्यामुळे आपणच फूट पाडत असल्याचे दिसते.

योगी यांच्या नार्‍यामध्ये चुकीचे काही नाही. इतिहास पाहता ज्या ज्या वेळी हा देश जातींमध्ये फुटला, प्रांतांमध्ये फुटला, समुदायांमध्ये फुटला त्याचा तोटाच झाला. यामध्ये व्यक्ती पण संपला आणि देश पण संपवायचा प्रयत्न झाला. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे कोणी म्हणत असेल ‘बाटीए मत’ तर ते आक्षेपार्ह काय आहे.

मुस्लीम समाज म्हणतोय की, आम्ही एक होण्याचा प्रयत्न केला तर देशविरोधी ठरवले जाते. पण, हिंदूंनी एकजूट केली तर क्रांती का म्हटले जाते?


देशात एक होणे चांगली गोष्ट आहे. पण, लोकसभा निवडणुकीत आपण काय पाहिले तर ‘व्होट जिहाद.’ त्यांच्या धर्मस्थळावर काय बॅनर लागले, तर महाविकास आघाडीला मतदान नाही केले, तर अल्लासोबत बेईमानी आहे. ही कोणती धर्मनिरपेक्षता आहे? हेतू काय तर मोदींना पराभूत करा.

आपल्या पक्षाचा नारा आहे की, जे रामाला घेऊन आलेत, आपल्याला त्यांना आणायचे आहे, हे कसे काय?


त्यात चुकीचे काय आहे? आमच्या पक्षाने शपथ तर नाही घेतली, ना की भाजपला मतदान केले. तर श्रीरामासोबत बेईमानी आहे. असे आम्ही कुठेच केले नाही. आता महाविकास आघाडी मतांसाठी मुस्लीम समाजाचे तळवे चाटत आहे. त्यांनी १७ मागण्या केल्या आहेत. त्यातील केवळ एक सांगतो, महाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सालच्या दरम्यान ज्या दंगली झाल्या, त्यात मुस्लीम समाजावरील गुन्हे मागे घ्यावेत. हे कोणते राजकारण आहे? त्यामुळे आमच्यात फूट पडली, तर संपणार हे खरे आहे. हे असत्याची लढाई करीत आहेत. त्यामुळे ही लढाई आम्ही लढत आहोत. आम्ही ‘इट का जबाब पत्थर से देंगे.’ आम्ही महात्मा गांधी आणि अहिंसेला मानतो. पण, हे तत्त्व मान्य नाही की, समोरचे मारत राहतील आणि आम्ही गप्प राहू?

ओवेसी आल्यावर किंवा निवडणूक काळात औरंगजेब कसा आठवतो?


ओवेसीच्या सभेत सांगितले जाते की, संभाजीनगर नाव कसे दिले? संभाजीचा काय संबंध आहे? ते म्हणतात की, रझाकारांची जमीन आहे. त्यामुळे आम्हाला सांगावे लागते की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. रझाकारांनी या जागेवर कब्जा केला होता. त्यांनी अन्याय, अत्याचार केला होता. ते म्हणतात पुन्हा औरंगाबाद करू, तर ते आम्ही कसे सहन करायचे?

ते म्हणतात, आम्ही इंग्रजांविरोधात लढाई लढली. त्यांच्या पूर्वजांनी इंग्रजांना ‘लव्ह लेटर’ लिहिले, असे सांगितले जाते.


त्यांचा इतिहास त्यांनी सांगितला तर त्यांना मान खाली घालायला लावणारा आहे. त्यांनी कोणतीही लढाई लढली नाही. ज्या लढल्या त्या त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी लढल्या, देशासाठी नाही लढाई लढले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधींना शहाजादा म्हणतात. पण, तेच राहुल गांधी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणत नाहीत.


बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हटले जाते. तसेच आम्ही समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नाव दिले. तसेच रुग्नालय, प्राणीसंग्रहालय यांनाही नाव देताना हिंदुहृदयसम्राट असा शब्द वापरला आहे. काँग्रेसचे नेते याला का घाबरतात? ते हिंदुहृदयसम्राट होते हे सर्वमान्य आहे. आजकाल उद्धव ठाकरेंची शिवसेनाही शिवसेना प्रमुख असा शब्द वापरत आहे. त्यांनीही हिंदुहृदयसम्राट बोलणे सोडले तर शहाजाद्यांचा प्रश्नच येत नाही.

मागच्या पाच वर्षांत दोनदा सरकार तुटले, कुटुंब फुटले, याचा परिणाम निवडणुकीत कसा असेल?


त्याचा परिणाम दिसणार नाही. हे पक्ष तोडणे-जोडणे, कुटुंब जोडणे-तोडणे यांच महारथी शरद पवार हे आहेत. कारण, त्यांचा विश्वपितामह म्हणता येईल. त्यांचे नॅरेटिव्ह आम्ही तोडले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे व्यक्तीगत महत्वाकांक्षा आम्ही हाणून पडल्या. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना संपवू पाहत होते, तर शरद पवार अजित पवारांना संपवू पाहत आहेत. म्हणून पक्ष फुटलेले आहेत.

लोकसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार अधिक निवडून आले. हे खरे का?


नाही, फेक नॅरेटिव्हमुळे त्यांचे उमेदवार निवडून आले. कारण, संविधान बदलणार अशा अफवा त्यांनी पसरवल्या.

अजित पवार अजूनही शरद पवारांचे फोटो वापरत आहेत, त्यावरून त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. याबाबत काय सांगाल?


अजित पवारांनी शरद पवारांचा फोटो वापरणे केव्हाच सोडले आहे. त्यांनी तसे कोर्टात सांगितले आहे. तरीही कोणी कार्यकर्ते वापरत असतील सुधारणा करू. हा त्यांचा कौटुंबिक विजय आहे. त्यांच्या मनात आदर असू शकतो.

या निवडणुकीत नातेवाईक एकमेकांविरोधात उभे आहेत.


अनेक ठिकाणी पवारांनी असे केले आहे. आम्ही केले तर फसवणूक आणि परांनी केले तर त्यांना चाणक्य म्हटले जाते, असे का होते. शरद पवारांची मीडियात इको सिस्टीम चालते, हे खरे आहे.

उद्धव ठाकरेंबाबत दरवाजे बंद झाले आहेत का?


होय, २०१९ सालच्या निवडणुकीतून आम्ही शिकलो आहोत. काहीही होऊ शकते. तरीही आम्ही सांगतो की आम्हाला गरज पडणार नाही. यावेळी महायुतीला कौल देतील.

पक्ष नवीन चेहर्‍यांना संधी देणार आहे का? आपण राष्ट्रीय बनणार का?


मी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही, मी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही. भाजप माझे घर आहे. देवेंद्र फडणीस असा नट आहे जो कुठेही फिट बसतो.