शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील झाँशी येथील राणी लक्ष्मीबाई रुग्णालयातील धक्कादायक घटना
16-Nov-2024
Total Views |
झाँशी : उत्तर प्रदेशातील झाँशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एनआयसीयू वॉर्ड येथे १४ नोव्हेंबर शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ हून अधिक लहान मुले जखमी झाली आहेत. वॉर्डात ४९ मुले दाखल होती, त्यापैकी ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.
कृपालसिंह राजपूर या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने स्वत: २० ते २५ मुलांना वाचवले आहे. रुग्णालयात अग्निसुरक्षेची योग्य ती व्यवस्था नसल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सरकारने याप्रकरणी झालेली नुकसान भरपाई जाहीर केली.
या घडलेल्या दुर्घटनेवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत्यू आणि जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. अपघातावर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिराऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.