मुंबई, दि.१५ : मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
विशेष उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
1. मंगळवार-बुधवार (दि.१९-२०)
मुख्य लाईन (डाऊन लाईन)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तीन वाजता सुटेल, कल्याण येथे साडेचार वाजता पोहोचेल.
मेन लाईन (अप)
कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून तीन वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे साडेचार वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तीन वाजता सुटेल, पनवेल येथे ४:२० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन (अप):
पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २: पनवेल येथून तीन वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४:२० वाजता पोहोचेल.
2. बुधवार-गुरुवार रात्री ( दि.२०-२१)
मुख्य लाईन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १:१० वाजता सुटेल, कल्याण येथे २:४० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २:३० वाजता सुटेल, कल्याण येथे चार वाजता पोहोचेल.
मेन लाईन (अप):
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल: कल्याण एक वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २:३० वाजता पोहोचेल. कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून २:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३:३० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १:४० वाजता सुटेल, पनवेल येथे तीन वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२:५० वाजता सुटेल, पनवेल येथे ४:१० वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन (अप):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: पनवेल येथून १:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २:२० वाजता पोहोचेल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्पेशल: पनवेल येथून २:३० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३:५० वाजता पोहोचेल.
वेळापत्रकानुसार, सर्व विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. या विशेष सेवांमुळे संपर्क वाढवणे आणि निवडणूक सहभागींची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. या रात्री प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या गरजांसाठी या अतिरिक्त सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आम्हाला आशा आहे की या उपक्रमामुळे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल.