पंतप्रधान मोदींची भव्य सभा; दादर परिसतातील वाहतुकीत बदल

सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल

    14-Nov-2024
Total Views |

dadar



मुंबई, दि.१४ :
प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवार दि.१२ रोजी वाहतूक निर्बंध आणि वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.

यासोबतच, वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून देखील सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहने येण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दादर आणि आजूबाजूच्या १४ मार्गांवरील वाहनांसाठी आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध राहणार आहेत. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनीवरून प्रवास करणार्यांनी सिध्दिविनायक मंदिर जंक्शन येथून उजवे वळण घेत एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. तर स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी मार्गावरून जाणाऱ्यांनी दांडेकर चौक येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन.सी.केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा.

वाहनतळ संदर्भात सूचना

जाहिर सभेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या वाहनांनी निश्चित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करावीत, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

१. पश्चिम आणि उत्तर उपनगरे

पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माहिम रेल्वे स्थानक येथे आल्यानंतर माहिम रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज यादरम्यान जाहिर सभेस येणाऱ्या नागरिकांना उतरुन वाहने रेती बंदर, माहिम, सेनापती बापट मार्गावर, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, कामगार मैदान, तसेच हलकी वाहने इंडिया बुल वन सेंटर सार्वजनिक वाहनतळामध्ये पार्क करु शकतात.

२. पुर्व उपनगरे

ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरुन वाहने पाच गार्डन-माटुंगा आणि आर. ए. के. ४ रस्ता येथे पार्क करावी.
३. शहरे व दक्षिण मुंबई

वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाटय मंदिर येथे उतरुन वाहने इंडिया बुल्स फायनान्स सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, पांडुरंग बुधकर मार्ग, गलास्को जंक्शन ते कुरणे चौक, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीक मार्ग ते सेक्रेट हार्ड हायस्कूल ते जे. के. कपुर चौक पर्यंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. टी सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गार्डन माटुंगा किंवा आर. ए. के. ४ रोड या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील.