कल्याण : १६० वर्ष अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने ‘कथा/कविता लेखन स्पर्धा २०२४’ आयोजित करण्यात आली आहे. कथा-कवितेला विषयाचे बंधन नाही. कथा/ कविता ही स्वलिखित व अप्रकाशित असावी. कथा १५०० ते २००० शब्दांची आणि कविता १६ ते २० ओळींची असावी. कथा/ कविता केवळ मराठी भाषेतच असावी असे या स्पर्धेचे नियम आहेत. या स्पर्धेसाठी कथा-कविता पाठविण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे. सदर स्पर्धा खुल्या गटासाठी आहे. विजयी स्पर्धकांना प्रथम, व्दितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील .इच्छुक स्पर्धकांनी आपल्या कथा व कविता सुंदर व सुवाच्य अक्षरात लिहून अथवा टाईप करून वाचनालयात जमा करायच्या आहेत किंवा पोस्टाने ‘सार्वजनिक वाचनालय कल्याण,कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसमोर,छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण (प) ४२१३०१’ या पत्त्यावर पाठवायच्या आहेत. मेलवर कथा/ कविता स्विकारल्या जाणार नाही. अधिक माहितीसाठी श्री.भिकू बारस्कर, सरचिटणीस (९३२४२७११४६) यांच्याशी संपर्क साधावा.