ओवैसीला सांगू इच्छितो की, रझाकारांचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे स्वप्न गाडून टाकू...
12-Nov-2024
Total Views |
छत्रपती संभाजीनगर : ( Devendra Fadnavis ) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दि. ९ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"अलीकडच्या काळामध्ये ओवैसीदेखील पोपटासारखा बोलतोय. पण मी ओवैसीला कालच सांगितलं हे हैद्राबाद नाहीये ही मुंबई आहे हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्माकरीता लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चीत केलं तो हा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही रझाकारांचे सरकार पुन्हा इथे आणण्याचे स्वप्न पाहू नका. ओवैसी, ज्या रझाकारांना आम्ही या महाराष्ट्रातून घालवलं त्यांना पुन्हा इथे आणण्याचे स्वप्न पाहाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाडून टाकू. आम्ही कोणत्या धर्माविरोधात नाही पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुलं टाकत असेल तर लक्षात ठेवा आमच्या संभाजीराजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडगंदेखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं. पण मराठ्यांना औरंगजेब कधीच हरवू शकला नाही. त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब असाल तर हे आम्ही सहन करणार नाही." असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमला दिला आहे.