मुंबई : भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला स्वाभिमान अभिमान गहाण ठेवला आहे. मतांच्या हव्यासोपोटी आता त्यांनी दिवाळी सणाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिकेच्या दादर शिवाजी पार्क येथे काही मनसे कार्यकर्त्यांनी आणि हिंदू बांधवांनी दिवाळी साजरी केली. मात्र आता याला उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजीपार्क हे मुंबई महापालिकेच्या आखत्यारित्या असल्याचे सांगत आता उबाठा गटाने हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे.
सध्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आहे. यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सण साजरा करण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला असल्याचे पत्र जाहीर झाल्याचे वृत्त आहे.
उद्धव ठाकरे गटाने हा सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ विनयभंग असल्याचे चित्र असल्याचे पत्रात नमूद केले. तसेच काही ठिकाणी दिपोत्सवानिमित्त मनसेनं केलेल्या बॅनरबाजीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. याला आता उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, महापालिकेने याकडे लक्ष घालात निवडणूक आयोगाने सक्त कारवाई करावी असे पत्र उबाठा गटाने लिहिले आहे. यातून दीपोत्सवालाही त्यांनी विरोध दर्शवला असून त्यांच्याविरोधात उबाठा गटाने विरोध दर्शवला आहे