ऐन दिवाळीत केली भावनिक पोस्ट; शेअर केला पाकिस्तानी हिंदू मुलाचा 'तो' व्हिडिओ...

    01-Nov-2024
Total Views | 94

Pawan Kalyan-Pakistani Hindu Boy

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pawan Kalyan Diwali Wishes) 
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दिवाळीनिमित्त एका पाकिस्तानी हिंदू मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमुळे पवन कल्याण भावूक झाले असून त्यांनी तेथील हिंदू बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी बालक त्यांच्या भाषेत 'अलबेलो इंडिया' गाणे गात आहे. मुलाचे गाणे आणि भावना समजून घेऊन, पवन कल्याण लिहितात, पाकिस्तानातील हिंदू मुलाचे हे गाणे फाळणीच्या तीव्र वेदना आणि भारताच्या आत्म्याशी पुन्हा जोडण्याची तळमळ दर्शवते.

हे वाचलंत का? : दिपोत्सव साजरा केल्याने उद्धव ठाकरेंना पोटदुखी



पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदूंना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत पुढे ते म्हणाले, विशेषत: बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंना प्रभु श्रीराम सामना करण्याची शक्ती आणि धैर्य देवो. आम्ही सर्व भारतात सुरक्षिततेची आणि स्थिरतेची वाट पाहत आहोत. मला आशा आहे की विश्व समुदाय आणि जागतिक नेते पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये छळ होत असलेल्या हिंदूंशी त्यांच्या मूलभूत हक्कांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी संपर्क साधतील. त्यांच्या भूमीत धर्माची पुनर्स्थापना झाली पाहिजे.”

अग्रलेख
जरुर वाचा
‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

‘ऑपरेशन सिंदूर’ : सामरिक स्वावलंबनाचा नवा मानदंड

विसाव्या शतकातील जागतिक संघर्षांच्या अनुभवातून शिकत, भारताने एकविसाव्या शतकात आपल्या संरक्षण धोरणात निर्णायक बदल केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे या परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी उदाहरण. ही मोहीम केवळ सैनिकी विजयावर सीमित राहिली नाही, तर भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक बनली. तसेच या मोहिमेने जगाला एक स्पष्ट संदेश दिला की, भारत आता कोणत्याही शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या यशाने भारताच्या परराष्ट्र धोरणात एक नवा मानदंड स्थापित केला आणि जागतिक मंचावर आपल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121