स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे पीयूष गोयल यांच्या हस्ते अनावरण

    07-Oct-2024
Total Views |

veer savarkar
 
मुंबई, दि. ६ : (Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
 
पुतळ्याचे अनावरण करताना खा. पीयूष गोयल यांनी भारतमातेचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशासाठी केलेले महान कार्य आणि अतुलनीय योगदान यावर प्रकाश टाकला.
 
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या युवकांचे आदर्श आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलेल्या सावरकरजींचे त्याग, समर्पण, योगदान आणि बलिदान आपल्या भावी पिढ्यांनी स्मरणात ठेवण्यासारखे आहे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकरजींचा पुतळा उभारण्यात येत आहे. त्यांच्या धारदार लेखणीने राष्ट्रवादाची विचारधारा त्या काळी देशवासियांच्या हृदयात रुजवली होती आणि आजही सावरकरजींचे दूरदर्शी विचार, त्यांचा वारसा आणि विचार युवकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्यरत आहेत.”