कट्टरपंथी मोहम्मद निसार कुरेशीने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण
06-Oct-2024
Total Views |
सिद्धार्थनगर : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका ९ वर्षीय हिंदू मुलीवर बलात्कार केल्याची घटना आहे. एका मोहम्मद निसार कुरेशी नावाच्या कट्टरपंथी व्यक्तीने तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि इतर कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी निसार हा परिसरात हातगाडी लावून फळे विकायचा. ही घटना गुरूवारी ३ ऑक्टोंबर रोजी घडली होती.
पीडितेचे वडील हे रिक्षाचालक असून त्यांचा उदरनिर्वाह हा रिक्षावर होता. यावेळी अल्पवयीन मुलीच्या वडिलांना या घडलेल्या घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत लिहिले की, पीडित अल्पवयीन जेव्हा घरी आली तेव्हा तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.
त्यानंतर निसारने मुलीला सरकारी शाळेच्या मागे नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. बलात्कारामुळे पीडितेची प्रकृती खालावल्याने पीडितेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी मुलीचा तपास करण्यात आला तेव्हा निसारने याआधीही पीडितेचा विनयभंग केल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी निसार कुरेशीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ६५(२) आणि पॉक्सो कायाद्यांतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांचे पथक आरोपीचा पाठलाग करत आहेत.