तिरुवनंतपुरम : केरळ येथे मलप्पुरम जिल्ह्यात अली हुसैन नावाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Sexul Assault Minor Girl) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला वेफर्स देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी अली हुसैनला अटक करण्यात आली असून हुसैनची चौकशी करण्यात आली आहे.
यारप्रकरणी आता प्रसारमाध्यमानुसार, गुरूवारी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मलप्पुरमच्या निलांबूर येथे पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. ही मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत मजूर म्हणून काम करत होती. गुरूवारी रात्री ही मुलगी बेपत्ता झाली होती. शेजारी राहणाऱ्या ५३ वर्षीय हुसैनने तिला वेफर्स देण्याच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर ही घटना तिच्या आईला वडिलांना समजली.
पाच वर्षांच्या अल्पवयीन युवतीने घडलेला प्रसंग तिच्या कुटुंबाला सांगितला आहे. त्यावेळी मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर अली हुसैनने येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी हुसैनचा शोध सुरू केला आणि त्यावेळी त्याला स्थानिक गोदामातून ताब्यात घेतले. पोलिसांनी हुसैनवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून भारतीय न्यायसंहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.