मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील संरक्षक भिंतीवर उडी घेतली आहे. त्यांच्यासह इतर आदिवासी आमदारांनीदेखील एकामागून एक जाळीवर उडी घेतली आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देऊ नये, यासह अनेक मागण्यांसाठी त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे.
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी नरहरी झिरवाळांकडून आंदोलन सुरु आहे. दरम्यान, त्यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, यात काहीही ठोस निर्णय न झाल्याने नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या.
हे वाचलंत का? - हर्षवर्धन पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार! लवकरच शरद पवार गटात प्रवेश
नरहरी झिरवाळ यांच्यासोबतच काँग्रेस नेते हिरामण खोसकर आणि भाजप खासदार हेमंत सावरा यांनीदेखील जाळीवर उडी घेतली. पोलिसांनी या सर्वांना जाळीवरून बाहेर काढले असून त्यांनी मंत्रालयाचा ताबा घेतला आहे. आंदोलनादरम्यान नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत.