आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीवर भर दिला जातो. मोठे रस्ते प्रकल्प, गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण विमानतळे, मोठमोठी बंदरे आणि सागरीसेतू, मेट्रो आणि अद्ययावत रेल्वे प्रकल्पांचे जाळे उभारले जाते आहे. हे प्रकल्प जलद आणि अद्ययावत असावे, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अभियांत्रिकी कौशल्याचा कसही लागतो. हीच कौशल्ये प्रगत तंत्रज्ञानाद्वारे अधिक व्यापक करत ‘आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी महासंघ’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ आणि ‘ईव्हाय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर लीडर’ने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेआधारे पायाभूत सुविधा क्षेत्रात परिवर्तन करण्याची क्षमता कशी आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्राला मागील दशकांत आणि भविष्यातही हवामान बदल, शहरी विस्तार, आर्थिक अनिश्चितता, कामगार टंचाई आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यांसह मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. प्रकल्प जलद, अधिक किफायतशीर आणि टिकाऊ करण्यासाठी अदयावत प्रगत मार्गांची या क्षेत्राला आवश्यकता आहे. या समस्यांचे निराकरण करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता नक्कीच एक महत्त्वपूर्ण साधन असेल, असे या अहवालात म्हटले आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्राचे सध्याचे दृष्टिकोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, ‘ईआय इन्फ्रा’ने ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स ग्लोबल लीडरशिप फोरम (GLF)’ सदस्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये पायाभूत सुविधा उद्योगातील प्रमुख व्यक्ती आणि नेत्यांना सर्वेक्षणात नमुना म्हणून समाविष्ट करण्यात आले. एप्रिल २०२४ मध्ये ‘ईआय इन्फ्रा’ने ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनिअर्स ग्लोबल लीडरशिप फोरम’च्या बैठकीत विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करून कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये सद्यस्थिती अभियांत्रिकी आणि पायाभूत क्षेत्रात ‘एआय’चा वापर, पायाभूत सुविधांमध्ये ‘एआय’ स्वीकारण्यास असणारे अडथळे, व्यापक ‘एआय’ राबविण्याची आवश्यकता आणि ‘एआय’चे संभाव्य फायदे यांवर सल्लामसलत करण्यात आली.
यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रातील ४४ जागतिक लीडर आणि उद्योजक निरीक्षण सर्वेक्षणाच्या निकालांमध्ये केंद्रस्थानी होते. यावेळी समोर आलेले निष्कर्ष संमिश्र आहेत. या अहवालातील निष्कर्षांनुसार, ‘एआय’मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे, असे प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. काही संस्था ‘एआय’साठी त्यांच्या कमाईच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करत आहेत, तर काही दहा टक्के गुंतवणुकीसह अधिक धाडसी पाऊले उचलत आहेत. ‘एआय’ पद्धती स्वीकारण्यात इतर अडथळ्यांमध्ये गुंतवणुकीवरील अस्पष्ट परतावा, हाताळण्यातील कौशल्य, पारंपरिक कौशल्यातील तफावत आणि तांत्रिक अडचणी याचा समावेश होतो. हे अडथळे लक्षात घेता, ‘एआय’चा वापर कमी आहे, तर दुसरीकडे ‘एआय’चेच फायदे समजून घेणार्या आणि त्याचा सर्वोत्तम परिणाम घडवून आणणार्यांना आपले उद्योग गतिमान करण्यासाठी उपलब्ध ‘एआय’ तंत्रज्ञानाबाबत अधिक स्पष्टता आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्राने ‘एआय’चा वापर करून घेण्यास चांगली सुरुवात केल्याचे अहवालात म्हटले असले तरी, निर्णयक्षमता सुधारण्यासाठी, लवचिकता निर्माण करण्यासाठी, उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि मालमत्तेचे आयुष्यमान वाढविण्यासाठी ‘एआय’ संसाधनाच्या प्रभावी वापरासाठी उद्युक्त करणेही तितकेच आवश्यक आहे. हा अहवाल पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘सिस्टीम थिंकिंग’ या व्यापक दृष्टिकोनातून ‘एआय’कडे पाहण्याचा सल्ला देतो. संभाव्य समस्यांचा अंदाज बांधण्यासाठी आणि प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये संसाधनांचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी ‘एआय’ मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण करू शकते. यामुळे भागधारकांमधील अडथळे दूर होतील, खर्च कमी होईल आणि वितरण जलद होईल. हा अहवाल म्हणतो की, पद्धतशीर बदल साध्य करण्यासाठी आठ प्रमुख गटांमध्ये सहकार्य आवश्यक आहे. यामध्ये मालमत्ताधारक, ऑपरेटर, सल्लागार, कंत्राटदार, सरकार, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान प्रदाते आणि भांडवली गुंतवणूकदार या सर्वांनी एकत्रितपणे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमतेच्या प्रभावी वापरावर भर दिला पाहिजे.