मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Maulana Tauqeer Raza on Diwali) बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांबाबत केलेल्या विधानावर इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी 'हिंदूंनी दिवाळीत फटाके फोडू नयेत' असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, "दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. फटाके फोडून देशाचं नुकसान करू नका."
हे वाचलंत का? : मनोज जरांगे मुस्लिम-बौद्ध धर्मगुरूंशी साधणार संवाद
मौलाना तौकीर रझा खान यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, त्यामुळे शक्य तितके दिवे प्रज्वलित करा. परंतु देशात प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही हे पाहता फटाके फोडू नका. आनंद व्यक्त करण्यासाठी कमी प्रमाणात फटाके वाजवा, पण लाखो-कोट्यवधींचे फटाके फोडून देशाच्या संपत्तीला आग लावण्याचे काम करू नका."
दिवाळीतील फटाक्यांबाबत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, सनातन हिंदू धर्माचे सण आले की कोणीतरी कायद्याबद्दल बोलतं, त्यावर बंदी घालण्याबाबत कोणी बोलतो, हे देशाचं दुर्दैव आहे. दिवाळीला दिव्यांमध्ये मोठ्याप्रमाणात तेल-तूप जाळले जाते, ते गरिबांमध्ये वाटले तर बरे होईल, अशा स्वरूपाच्या बातम्याही येतात. या देशातही बकरीईद साजरी केली जाते. मग बकरी ईदही थांबवा.