मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ayodhya Deepotsav 2024) अयोध्येत बुधवारी तब्बल ५०० वर्षांनी प्रभु श्रीरामललांच्या साक्षीने भव्य दीपोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी श्रीरामनगरीत संत, महंत आणि रामभक्त मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा प्रामुख्याने दिपोत्सवाला उपस्थित होते. दरम्यान २८ लाख दिवे प्रज्वलिक करण्याचा विश्वविक्रम यंदाच्या दिपोत्सवात करण्यात आला आहे. गेल्यावर्षी २२ लाख दिवे लावत विश्वविक्रम करण्यात आला होता.
हे वाचलंत का? : हिंदूंनी दिवाळीत फटाके फोडू नयेत : मौलाना तौकीर रझा खान
दिपोत्सवावेळी सुरुवातीला प्रभु श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान हे पुष्पक विमानातून (हेलिकॉप्टरमधून) अयोध्येत पोहोचले. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. सुमारे ३० हजार लोकांनी दिपोत्सवाला उपस्थित राहून विश्वविक्रम घडवण्यात आपला सहभाग नोंदवला होता. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि विशेष सुविधांसाठी प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती.
यंदाच्या आठवा दिपोत्सव असून अयोध्येत दोन विश्वविक्रम झाले आहेत. सातव्या दीपोत्सवात अयोध्येत एकाच वेळी २२ लाख २३ हजार दिवे लावण्याचा विश्वविक्रम करण्यात आला होता. यावर्षी २५ लाख १२ हजार ५८२ दिवे प्रज्वलित करण्याचा नवी विश्वविक्रम केला आहे. याशिवाय पहिल्यांदाच ११२१ वेदाचार्यांनी एकत्रितपणे शरयू नदीची आरती केल्याचाही विक्रम नोंदविण्यात आला आहे.