सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजारात घसरण; फंड इंडेक्स उत्तम पर्याय?

    30-Oct-2024
Total Views |
indian share market down


मुंबई :      दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ४२६.८५ अंकांनी तर निफ्टी १२५.९९ अंकांनी कोसळला. गेल्या दोन-तीन दिवसांच्या चढ उतारानंतर स्मॉल कॅप समभागांनी चांगली कामगिरी नोंदविली. मागील काही दिवसांपासून भारतीय भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला होता.




दरम्यान, निफ्टी स्मॉलकॅप २०० इंडेक्स १.०५ टक्क्यांनी वधारला असून स्मॉल-कॅप समभागांनी तुलनेने चांगली कामगिरी केली. तर दुसरीकडे निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्समध्ये ०.१६ टक्क्यांनी किरकोळ घसरण झाली. एफएमसीजी, मीडिया, मेटल आणि हेल्थ क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये आज घसरण दिसून आली.

अदानी एंटरप्रायझेस, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, हिरो मोटोकॉर्प, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी इंडिया या कंपन्यांच्या समभागात ३.७४ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली आहे. यादरम्यान, व्यापाऱ्यांनी हेज्ड धोरण अवलंबले पाहिजे आणि काळजीपूर्वक निवडलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच, बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील आघाडीच्या समभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला बाजार तज्ज्ञ देत आहेत.